करवीर, गगनबावडा, आजरा तालुक्याने राबविला पॅटर्न
गुगल फॉर्मद्वारे घेतली जाणार कोरोना लक्षणांची माहिती
प्रवीण देसाई / कोल्हापूर
कोरोनाची लक्षणे तपासण्यासाठी आता थेट ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर व मेडिकल स्टोअर्सवाल्यांकडून आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे. करवीर,गगनबावडा व आजरा तालुक्याने आपल्या स्तरावर हा पॅटर्न तयार केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामस्तरीय यंत्रणेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. परंतु सर्वांकडून व्यवस्थित व सविस्तर माहिती दिली जातेच असे होत नाही. त्यामुळे यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील करवीर व गगनबावडा तालुक्यात हा पॅटर्न राबविला आहेत. आज्रयाचे तहसीलदार अहिर यांनीही भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा तहसीलदार विकास अहिर यांनी एक पॅटर्न राबविला आहे.
या पॅटर्ननुसार गावातील खासगी डॉक्टर व मेडिकल स्टोअर्सवाल्यांना आरोग्य उपकेंद्रस्तरावरून गुगल फॉर्मची लिंक देण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्टर व मेडिकल दुकानांमध्ये येणाया नागरिकांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पडसे, डोकेदुखी अशी कोणती लक्षणे आहेत का ? हे पाहायचे आहे. अशी लक्षणे असणायांचे नाव गुगल फॉर्ममध्ये भरली जाणार आहेत. त्यानंतर ही नावे प्रांताधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयाकडे पाठविली जाणार आहेत. ही नावे प्राप्त झाल्यावर गावनिहाय आरोग्य सेविकांकडून त्या व्यक्तींची शहानिशा केली जाईल. त्यामुळे कोण कोरोनाबाधित असल्यास ते समोर होईल. तसेच त्यांना पुढील उपचार तातडीने मिळण्यास मदत होणार आहे.
लक्षणे असणायांचा शोध घेण्यास होणार मदत
डॉक्टर व मेडिकल स्टोअर्सवाल्यांकडून गुगल फॉर्मद्वारे गावनिहाय माहिती घेतली जाणार आहे. यामुळे कोरोनाची लक्षणे असणायांचा शोध घेण्यास मदत होईल . -वैभव नावडकर, प्रांताधिकारी, करवीर.









