ऑनलाईन टीम / रियाध :
सौदी अरबचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीपासूनच कर्जबाजारी असलेला पाकिस्तान आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.
पाकिस्तान आणि लेबनॉन हे दोन्ही देश सौदीकडून मिळणाऱ्या पेट्रो डॉलरवर आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, आता सौदीचे प्रिंस सलमान यांनी ही आर्थिक मदत बंद केली आहे. तसेच यापूर्वी घेतलेले 5 अरब डॉलर्सचे कर्जही फेडण्यास सांगितले आहे. त्यामुळे कर्जबाजारी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणखी बिघडणार आहे.
कर्जबाजारी पाकिस्तान आता सौदीचे कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे. किंबहुना कर्जावरील व्याजही पाक फेडू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानला आता देश गहाण ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पेट्रो डॉलर वाटून सौदीच्या शाही परिवाराला कोणताही फायदा झाला नसल्याने प्रिन्स सलमान यांनी ही आर्थिक मदत बंद केली आहे.









