पणजी/ प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती आणि अत्यंत विद्वान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त, दरवषी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा राज्यस्तरीय शिक्षक दिन यावषी पुढे ढकलण्यात आला आहे. यावषी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा पाळाला जात असल्यामुळे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा आज 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार नाही, तो नंतर साजरा केला जाईल, असे सरकारतर्फे कळविण्यात आले आहे.









