नवी दिल्ली
किया मोटर्सची सोनेट ही बहुप्रतिक्षीत नवी कार बाजारात दाखल करण्याबाबतची उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. कंपनीने ही नवी गाडी येत्या 18 सप्टेंबरला भारतात लाँच करण्याचे जाहिर केले आहे. कंपनीची सब कॉम्पॅक्ट गटातील सुव्ह प्रकारची सोनेटविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता होती. आता कंपनीने तारीख जाहीर केली आहे. मात्र या गाडीची किंमत किती असणार आहे याबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाही. तरीही जाणकारांच्या मते या गाडीची किंमत 7 ते 12 लाख रुपये इतकी असू शकते. या गाडीचे बुकिंग ऑनलाइन करण्याची सोय कंपनीने उपलब्ध केली आहे. 25 हजार रुपये आगाऊ भरून ही गाडी ग्राहकांना बुक करता येणार आहे.









