प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यातील जैन समाजाच्यावतीने सांगली येथे उभारण्यात आलेल्या भगवान महावीर आयसीयु कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या संकट काळात सर्व समाज एकत्र येऊन काम करत आहेत, ही समाधानाची बाब आहे. ही वैद्यकीय सुविधा सर्व नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल असे मत उद्घाटन प्रसंगी पालकमंत्र्यांनी मत व्यक्त केलं.
यावेळी खासदार संजयकाका पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, संजय बजाज, मैनुद्दीन बागवान, डॉ. रविंद्र वाळवेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Previous Articleमिरज कोविड रुग्णालयातील 50 कर्मचाऱ्यांना कोरोना
Next Article कर्नाटक: राज्यात लवकरच ‘राईस एटीएम’ सुविधा








