बेंगळूर/प्रतिनिधी
केजी हळ्ळी आणि डीजे हळ्ळीतील हिंसक घटनांचा तपास जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरू झाला आहे. बेंगळूर शहरी जिल्हाधिकारी जी.एन. शिवमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे सल्लागार आणि शहर दिवाणी कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश जी. एस. रेवणकर, बेंगळुरूचे सहाय्यक आयुक्त व तहसीलदार यांच्यानेतृत्वाखाली चौकशी करण्यात येत आहे. समिती संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करणार आहे.
हिंसाचारादरम्यान, जाळपोळ करून जाळलेली वाहने आणि घर मालक समितीसमोर हजर झाले आणि त्यांनी आपले निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकारी शिवमूर्ती यांनी कोणत्याही घटनांशी संबंधित सर्व लोक आपले निवेदन देऊ शकतात. त्याचे विधान गुप्त ठेवले जाईल. या प्रकरणात अटक झालेल्या लोकांविषयी तक्रारी असल्यास चौकशी समितीही त्यांची चौकशी करेल. असे त्यांनी म्हंटले आहे. संपूर्ण तपासणी केल्यानंतर समिती आपला अहवाल सादर करणार आहे.