तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज तालुक्यात २६१ जणांनी कोरोनाची चाचणी केली असून त्यापैकी एकूण ४५ जणांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तालुक्यात कुर्डुवाडी, माढा, वाकाव ,रिधोरे , बारलोणी, मोडनिंब, चव्हाणवाडी, नगोर्ली, महातपुर, महिंसगाव आदी ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये तांदुळवाडी येथील एका पुरुषाचा व टेंभुर्णी येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
आज कुर्डुवाडी शहरात एकूण ८ रुग्ण बाधित झाले असून, माढा येथे ६, वाकाव येथे ११, रिधोरे येथे ५, बारलोणी येथे १, मोडनिंब येथे ७, चव्हाणवाडी येथे २, नगोर्ली येथे ३, महातपूर येथे १ व महिंसगाव येथे १ असे एकूण ४५ जण बाधित झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यात ११३२ जण कोरोना बाधित झाले असून त्यापैकी ७०० जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजपर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.









