बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बुधवारी राज्य सरकारला बेंगळूर हिंसाचार प्रकरणी निर्दोष लोकांना अटक करु नये आणि त्यांना दोषी ठरवले जाऊ नये, अशी मागणी केली आहे. गेल्या महिन्यात पूर्व बेंगळूरमधील डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी या ठिकाणी वादग्रस्त पोस्ट वरून हिंसाचार झाला होता.
यावेळी पोलिसांच्या गोळीबारात तीन जण ठार झाले होते. 11 ऑगस्टच्या रात्री स्थानिक कॉंग्रेसच्या आमदाराच्या घरावरही जमावाने हल्ला केला होता. हिंसाचार दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार कला होता.
सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात पोलिसांनी पुराव्याशिवाय अनेकांना अटक केली गेली आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करून या प्रकरणाचा पाठपुरावा करावा. ज्यांच्याविरूद्ध पुरावा नाही अशा लोकांना सोडा. निष्पापांना दोषी ठरवले जाऊ नये आणि त्याच वेळी खऱ्या दोषींना सोडले जाऊ नये, असे त्यानी म्हंटले आहे.