वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाची ऑगस्ट महिन्यातील विक्री 17.1 टक्क्यांनी वाढून 1,24,624 वर राहिली आहे. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत कंपनीने 1,06,413 इतकी वाहने विकली होती, अशी माहिती मंगळवारी कंपनीकडून देण्यात आली आहे.
ऑगस्टमध्ये देशातील बाजारात विक्री 20.2 टक्क्यांनी वधारुन 1,16,704 वर राहिली आहे. जी ऑगस्ट 2019 मध्ये 97,061 राहिली होती. महिन्याच्या कालावधीनुसार कंपनीच्या आल्टो आणि वॅगनआरची विक्री 97.7 टक्क्मयांनी वाढून 19,709 युनिटस्वर राहिली आहे. यासोबतच कॉम्पॅक्ट गटात स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायरची विक्री 14.2 टक्क्यांनी वधारुन 61,956 इतकी राहिली आहे. सेडान सियाजची विक्री 23.4 टक्क्यांनी घटून 1,223 वर राहिली आहे जी गेल्या वर्षी 1,596 युनिटस्वर होती. सध्या युटिलिटी वाहनांमध्ये बेझा, एस क्रॉस आणि इर्टिगा आदींची विक्री 13.5 टक्क्मयांनी वधारुन 21,030 वर पोहोचली आहे.









