आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनाने मंगळवारी उपचारासाठी नेल्यानंतर मृत्यू झाला. सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार कोठे करायचे यावरून बराच वेळ गोंधळ उडाला.
निंबवडे येथे काही दिवसांपूर्वी 5 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले. त्या परिसरातील अन्य लोकांचे स्वॅब घेण्यात आले. यातील एक 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीला त्रास होत होता. त्यांना इतर त्रास होते. उपचारासाठी आधी त्यांना कोरोना टेस्ट करण्यास सांगण्यात आले. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. परंतु नातेवाईकाना तो रिपोर्ट निगेटिव्ह वाटला.
सदर व्यक्तीला उपचारासाठी आटपाडीतिला आयसीयूमध्ये दाखलकरेपर्यंत त्यांचा आटपाडीत मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार कोठे करायचे, यावरून मत मतांतरे झाले. आटपाडी ओढ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा पाहणी करण्यात आली. निंबवडे येथिल नातेवाईकानी गावीच अंत्यसंस्कार करण्याची भूमिका मांडली. त्यांनतर अखेर मृतदेह निंबवडे ला नेण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








