प्रतिनिधी / संख
संख (ता.जत ) येथे ऊस व तुरीच्या शेतात गांजाची लागवड केलेल्या ५ लाख ७२ हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संख येथील राजेंद्र शिवाण्णा बिरादार यास उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिरादार यांच्यावर गुंगीकारक औषधे द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हे पेट्रोलिंग करत असताना संख येथे बेकायदेशीर संशयित राजेंद्र बिरादार यांच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याचे माहिती मिळाली होती. यानुसार कोळेकर यांनी गांजा लागवड असलेल्या ऊस व तुरीच्या शेतात गोपीनीय रित्या छापा टाकून सुमारे सव्वाशे किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत केली असता ५ लाख ७२ हजार पाचशे रुपये इतकी बाजारभावाप्रमाणे होत आहे. याप्रकरणी संशयित बिरादार यांना उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे, नितीन पलुस्कर ,गडदे यांनी केली आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कोरोनाची ‘एंट्री’
Next Article झाडावरून पडून नरतवडे येथील युवकाचा मृत्यू








