ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संक्रमण झाल्याने मागील काही दिवसांपासून ते दीर्घ कोमात गेले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
दिल्लीतील दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात मुखर्जी यांच्यावर उपचार सुरू होते. 9 ऑगस्टला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 10 ऑगस्टला त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. मागील 20 ते 21 दिवसांपासून ते कोमात होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
रविवारी सायंकाळपासून त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. तेव्हापासून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मुखर्जींवर लक्ष ठेवून होती. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते.









