प्रतिनिधी/ सांगली
मूळचे बेळगावचे आणि सध्या सांगली येथील रहिवासी असणारे शिवाजीराव लक्ष्मणराव ओऊळकर (वय 63) यांचे शनिवार दि. 29 रोजी सांगलीत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.
रामदेव गल्लातील स्टुडीओचे संचालक सुभाष ओऊळकर यांचे ते बंधू होत. सांगलीतील पर्यावरण संवर्धन चळवळीसह दरवर्षी होणारा कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाचा वर्धापनदिन, सांगलीला आलेल्या महापुरावेळी पाण्याच्या पातळीसह, आमराई आणि शहरातील अनेक छोटय़ा मोठय़ा समस्यांना दैनिकांमधील वाचकांच्या पत्रकांतून वाचा फोडण्याचे काम ते करत असत. सांगलीत स्थायिक झालेल्या बेळगाववासियांनी स्थापन केलेल्या बेळगाव मित्रमंडळाचे ते सक्रिय सदस्य होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे..









