शिरोळ / प्रतिनिधी
तेरा दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या नांदणी तालुका शिरोळ येथील राजेश बापू टारे वय 52 या शेतकऱ्याचा शिरोळ येथील पंचगंगा नदी पात्रात शनिवारी मृतदेह मिळून आला. याबाबतची नोंद शिरोळ पोलीसांत झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी 16 ऑगस्टला दुपारी नांदणी-शिरढोण दरम्यानच्या पुलावरून पंचगंगा नदी पात्रात टारे बुडाले होते.
महापूर आल्याने शोध कार्यात अडचणी येत होत्या जवानांनी, त्यांची शोध मोहीम राबविण्यात आली मात्र मृतदेह मिळाला नव्हता. पोलिसात बेपत्ताची वर्दी नाँद झाली होती. आज येथील शिरोळ कुरुंदवाड या जुन्या रस्त्यावरील पुलानजीक प्रेत आढळून आले. या कामी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleसातारा : ‘त्या’ दरोडेखोरांना पोलीस कोठडी
Next Article मुरगूडातील महिला बेपत्ता









