प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट ते इटकळ या महामार्गावरील रस्ता हा खराब झाला आहे. अक्कलकोट ते हन्नूर पर्यंत रस्ता हा चांगला असून पुढे निलेगाव, आरळी या गावाजवळून जाणारा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत .सर्व ठिकाणी रस्तावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. अक्कलकोट ते इटकळ हा रस्ता हा महामार्ग असून या रस्त्यावरून हजारो वाहनांची वर्दळ असते.
अक्कलकोट येथून तुळजापुरला दर्शनासाठी जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग केला जातो. याच मार्गे हैदराबाद, पुणे महामार्गकडे जाता येते. हन्नूर पासून ते इटकळ पर्यंतचा रस्ता खराब झाल्याने वाहन चालकातून संताप व्यक्त केला जात आहे. सदर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सोनू शेळके यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









