आवाहन केलेल्या मुर्तीचे त्या तळ्यात केले विसर्जन, वाई पालिकेला सुचले उशिरा शहाणपण, वेळे गावच्या हद्दीत ते कृत्रिम तळे, नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यावर दडपण, इतर चमको नगरसेवकांची नुसतीच लुडबुड
वाई / प्रतिनिधी
वाई शहरात यावर्षी घरगुती वा कोणतेही गणपती कृष्णा नदीच्या पात्रात विसर्जन करायचे नाही असा फतवा पालिकेच्यावतीने घेण्यात आला होता. ज्या दिवशी घरगुती विसर्जन होते त्याच दिवशी वाई पालिकेने वेळे गावच्या हद्दीत कृत्रिम तळे काढायला सुरुवात केली.ते तळे दोन दिवसात काढून पूर्ण केले आहे.नागरिकांना आवाहन केल्यानुसार नागरिकांनी मूर्ती दान उपक्रमात सहभाग नोंदवला. वाईच्या नगराध्यक्षा सौ.प्रतिभा शिंदे या सतत काम करताना दडपणाखाली असल्याचे जाणवते. इतर चमको नगरसेवकांची नुसतीच लुडबुड सुरू असते, असे काहीसे चित्र वाई पालिकेच्या बाबतीत सुरू आहे.
वाई शहर व परिसरातील गणेश भक्त दरवर्षी कृष्णा नदी पात्रात गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतात.यावर्षी कोरोनामुळे व स्वच्छतेच्या दृष्टीने कृष्णा नदी पात्रात विसर्जनाला मनाई करण्यात आली आहे. विसर्जनाच्या सातव्या दिवशी वार्डात मूर्ती दान हा उपक्रम पालिकेच्यावतीने राबवण्यात आला होता. गणेशभक्तांनी गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी मूर्ती दान केल्या.पालिकेने गोळा केलेल्या मूर्ती एका जागी ठेवल्या होत्या. गतवर्षी गोळा केलेल्या मूर्ती एका ठिकाणी तशाच होत्या, असे काही वाईतील नागरिक अजून ही सांगतात. वाई पालिकेने दान म्हणून घेतलेल्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी वेळे गावच्या परिसरातील एक गोशाळा आहे त्या गोशाळे च्या परिसरात मोकळ्या जागेत दोन दिवसांपूर्वी तळे खोदायला सुरुवात केली. तळे खोदून त्यात प्लास्टिक कागद टाकून पाणी भरले. त्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी दस्तुरखुद्द वाईच्या नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे, वाईच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान या कृत्रिम तळ्याबाबत काही चमको नगरसेवकांची नुसतीच लुडबुड सुरू असून नगराध्यक्ष डॉ.प्रतिभा शिंदे यांच्यावर काम करताना दडपण येत असल्याची चर्चा सुरू होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









