उध्दवा… दार उघड ! धार्मिकस्थळे उघडण्यासाठी मिरजेत भाजपाचा घंटानाद
प्रतिनिधी / मिरज
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा देव-देवतांवर विश्वास होता, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचाही आहे. मात्र, त्यांच्या खांद्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही दोन नास्तिक भुते घेतल्याने खुद्द मुख्यमंत्री ठाकरे सुद्धा नास्तिक झाले असावेत, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. लॉकडाऊनमधून पुनश्च हरिओम म्हणत बहुतांशी व्यवहार सुरू झाले. दारु दुकाने उघडण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. मग धार्मिक स्थळांवरच प्रवेशबंदी का ? असा सवाल करीत भाजपाने घंटानाद आंदोलन करुन राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मैदान दत्त मंदिर येथे हे आंदोलन झाले.
कोरोनाच्या संकटाशी सर्वजण लढत आहेतच, अशा परिस्थितीत धार्मिक स्थळांमध्ये व मंदिरांमध्ये जाऊन भाविकांच्या मनाला शांती मिळण्याची देखील गरज आहे. सर्व नियमांचे पालन करण्याच्या शर्तीवर मंदिरे तातडीने खुली करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. उध्दवा.दार उघड ! म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. यावेळी माजी महापौर संगीता खोत, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती संदीप आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, पांडुरंग कोरे, नगरसेवक शिवाजी दुर्वे, गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, ओंकार शुक्ल, गजेंद्र कुल्लोळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








