अमेरिकास्थित अभियंता संतोष महाजन करणार मनपाला ५० हजार शेणी दान
प्रतिनिधी / कोल्हापूर
मूळ कोल्हापूरचे पण सद्या नोकरीनिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये असणारे सॉफ्टवेअर इंजिनीअर संतोष दत्तात्रय महाजन हे कोल्हापूर महानगरपालिकेला ५० हजार शेणी देणार आहेत. सोशल मीडियावर शेणी दान बद्दल माहिती वाचून त्यांनी ही मदत केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील सर्व स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेणीचा तुटवडा जाणवत आहे. याबद्दल सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यम यातून शेणी दानबद्दल आवाहन करण्यात आले होते. डॉ.डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी याबद्दल आपल्या कॉलेज मधील मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहिती दिली होती. याला संतोष यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ५० हजार शेणी देत असल्याचे सांगितले.
संतोष यांनी १९९८ मध्ये कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील इंजिनीरिंग कॉलेज मधून बी.ई. कंप्युटर ही पदवी घेतली आहे. ते सद्या अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये पत्नी आदिती, मुले मोहित आणि अवधूत यांच्या सोबत राहतात. वॉलमार्ट आयएनसी या बहुराष्ट्रीय कंपनीत ते सॉफ्टवेअर इंजिनीअर मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. तर त्यांची आई श्रीमती मंगल आणि भाऊ सुधीर हे कोल्हापूरात साळोखेनगर येथे राहतात. सामाजिक उपक्रमात सक्रिय असणाऱ्या संतोष यांनी सातासमुद्रापार राहून आपल्या शहराबद्दल दाखवलेली ही कृतज्ञता कोल्हापूरची माणुसकी आणि दातृत्व अधोरेखित करणारी आहे.
कोल्हापूरने भरभरून दिलं – संतोष महाजन
माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरात झाले. मला कोल्हापूरने भरभरून दिले आहे. त्यामुळे कोल्हापूरबद्दल मनात कायम आपुलकी आणि प्रेम आहे. यातून ही छोटी मदत केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









