देशमुखनगर / वार्ताहर
कोरोना व्हायरसच्या साथीने सर्व जनांना हतबल केलेल आहे, प्रत्येकजन सर्वतोपरी प्रयत्न करुनहि आव्हाने वाढत आहेत. सातारा तालुक्यातील नांदगाव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या आखत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये कोरोना कहर सुरु असल्याचा पहायला मिळत आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गावांचा समावेश आहे, त्यातील, नांदगाव, वारणानगर, अंगापूर, कामेरी, लिंबाचीवाडी, फत्यापूर, कोपर्डे, खोजेवाडी, वर्णे, टिटवेवाडी या गावांमध्ये कोरोना साथीचा प्रादुर्भाव होत असल्याने कोरोनाचे रूग्न वाढत असून सातत्याने धडकी भरणारी आकडेवारी समोर येत आहे. यामध्ये कोरोनाचा ग्राफ वेगाने वाढताना दिसून येत आहे, ज्या त्या गावातील आशाताई, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक सेवीका, आरोग्य अधिकारी, डॉ. समीती, प्रत्येक नागरीक खबरदारीचे संर्व उपाय वेळोवेळी करत असतात.
या परीसरामध्ये भितीचे वातावरन निर्मान करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे, तर या कोरोनाच्या संकटात अनेकांनी या व्हायरसवर मात करून हि लढाई जिंकली आहे, तरीहि मात्र याच दरम्यान आणि अलीकडच्या काळात रूग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या घटकेला कोरोनाचा धोका वाढला असून परीसरात चिंताजनक आकडेवारी रोजच्यारोज समोर येत आहे, नव्या रूग्नांच्या संखेने उच्चांक गाठला असून गंभीर स्थिती निर्मान झाली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या काहि गावे कोरोना विषाणूच्या साथीने आजाराच्या विळख्यात आहे, या सर्व भागामध्ये कोरोना रूग्न मोठ्या प्रमाणात आढळून येतायत, अलीकडच्या काळात लॉकडानचे नियम शिथील केल्यानंतर पुंन्हा रुग्न वाढताना पहायला मिळतात.
वास्तवीक खर तर उष्ण वातावरणात कोरोना टिकणार नाही, उन्हाळ्यात कोरोनाचा प्रभाव कमी होनार असे अनेक तर्क लावले गेलेत, मात्र तस काहिही झाल नाहि, कोरोना रुग्नांच प्रमान कुठेहि कमी होताना पहायला मिळाल नाहि. आता तर या महिन्यात चालू पाऊसात कोरोनान डोक वर काढलय. त्याचबरोबर स्थानीक प्रशासणान कोरोना रुग्नांच्या चाचण्या वाढवल्यामुळे कोरोना व्हायरसचे रुग्न वाढत आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येकाने जास्त प्रमाणात काळजी घेणे गरजेचे आहे.









