ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकन प्रशासनाची व्यापाराशी संबंधित गुप्त माहिती चोरल्याप्रकरणी एका चिनी संशोधकाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेचे ॲटर्नी थॉमस टी. कुले आणि डेव्हिड डब्ल्यूएसटी. एफबीआयच्या रिचमंड विभागाने त्याच्या अटकेची माहिती दिली.
हायजो हू असे अटक करण्यात आलेल्या 34 वर्षीय संशोधकाचे नाव आहे. व्हर्जिनिया विद्यापीठात ही व्यक्ती संशोधक म्हणून काम करते.
मिळालेल्या माहितीनुसार, हायजो हू याने अमेरिकन प्रशासनाच्या परवानगीशिवाय त्यांच्या कॉम्प्युटरपर्यंत पोहचून व्यापाराशी संबंधित गुप्त माहिती चोरली. 25 ऑगस्ट 2020 रोजी गुप्तचर विभागाच्या तपासात ही माहिती उघड झाली. त्यानंतर शिकागोतील विमानतळावरून चीनच्या विमानात बसण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला अटक करण्यात आली. तपासात त्याच्याकडे सॉफ्टवेअर कोड असल्याचे उघड झाले.









