वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशातील बाहुबली नेता व बहुजन समाज पक्षाचा आमदार मुख्त्यार अन्सारी याच्या निकटच्या सहकार्याच्या मालकीचा खाटीकखाना पाडविण्यात आला आहे. हा खाटीकखाना मऊ जिल्हय़ात होता. तो बेकायदा असल्याने ही कृती करण्यात आली, अशी माहिती जिल्हय़ाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.
मुख्तार अन्सारी हा मऊ येथूनच आमदार आहे. खाटीकखान्याच्या मालकाचे नाव रईस कुरेशी असे आहे. मऊ जिल्हय़ाचा बराचसा भाग हरित पट्टय़ात मोडतो. तेथे हा खाटीकखाना होता. या भागातील इतर सर्व बेकायदा बांधकामे आणि आस्थापने तोडण्याची कारवाइ & सुरू आहे असे सांगण्यात आले.
भागात तणाव
खाटीकखाना पाडल्यानंतर या भागात मोठा तणाव निर्माण झाला. अन्सारी याच्या अनेक समर्थकांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या कारवाईचा संबंध धर्माशी जोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. तथापि, जिल्हा प्रशासनाने मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त आधीच् ा केल्याने कोणताही अवांछनीय प्रसंग घडला नाही. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे, असे सांगण्यात आले. खाटीकखान्याच्या आसपास जमावबंदी आदेश लागू झाला आहे.









