प्रतिनिधी / सोलापूर
देशात व राज्यात कोरोना या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार या वर्षी गणेश विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास प्रतिबंधीत केले आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक झोनच्या कार्यक्षेत्रामध्ये गणेश मुर्तींचे संकलन करून महापालिकेच्यावतीने गणपती विसर्जन करण्यात येणार असल्याचा निर्णय महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे महापौर श्रीकांचन्ना यन्नम यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या वतीने सर्व गणेश मंडळांकडून गणेशा मुर्तींचे संकलन करून तुळजापूर रोड येथील महापालिकेच्या मालकीच्या मंठाळकर वस्ती येथील खाणीमध्ये हिंदू शास्त्राप्रमाणे श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गणेश मंडळाना विभागीय कार्यालय येथून घेता येणार आहे.
यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधित सहा. आयुक्तांसह झोन अधिकार्यांनी त्यांच्या भागातील मध्यवर्ती महामंडळासोबत बैठका घेऊन पुढील उपायययोजना करण्याबाबत आदेश दिले. विसर्जनासाठी नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी दोन विभागीय कार्यालयासाठी प्रत्येकी एक सहा. आयुक्त, नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत. या बैठकीस उपमहापौर राजेश काळेमहिला प्रमुख नमिता थिटे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









