मुंबई
देशातील अग्रणी म्युच्युअल फंडमधील एक असणारी ऍक्सिस म्युच्युअल फंड यांनी आपल्या ग्राहकांसाठी आता व्हॉटसऍपच्या आधारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग खुला केला आहे. डिजिटल व्यवहार लक्षात घेऊनच हा निर्णय घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना कोणत्याही क्षणी आपली गुंतवणूक करता येणार आहे.
ऍक्सिस असेट मॅनेजमेंट कंपनीने या सुविधेसाठी गुंतवणूकदारांना 7506771113 हा नंबर उपलब्ध करुन देत या सेवेचा प्रारंभ केला आहे. यासोबतच गुंतवणूकदाराला आवश्यक असणारी सर्व माहिती एकाच ठिकाणी काही मिनिटातच उपलब्ध होणार आहे. यामुळे वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. ग्राहकांना आवश्यक असणाऱया आम्ही सर्व सेवा देण्यावर आगामी काळातही भर देणार असल्याचा दावा कंपनीचे एमडी आणि सीईओ चंद्रेश निगम यांनी म्हटले आहे.









