ऑनलाईन टीम / मुंबई :
अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात, मात्र, रद्द होऊ शकत नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, आर सुभाष रेड्डी आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती दिली जाऊ शकत नाही, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतली होती. देशभरातील अनेक विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या भूमिकेला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यासंदर्भातील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता.आज त्यावर न्यायालयाने निर्णय दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली असली तरी देखील आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत राज्य परीक्षा पुढे ढकलू शकते. त्यामुळे विद्यापीठांना परीक्षेची नवीन तारीख निश्चित करावी लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.