●वेब साईट केवळ कार्यलयीन वेळेत सुरू
●नागरिकांना ऑन लाईन बिल भरणे झाले मुस्किल
●पालिकेत घरपट्टी, पाणी पट्टी भरण्यासाठी जावेच लागते
सातारा/प्रतिनिधी
जिल्ह्यातील सातारा नगरपालिकेच्या वेब साईटची वेगळी तऱ्हा पहायला मिळत आहे.कोरोनाच्या काळात घरपट्टी, पाणी पट्टीची बिले पोहचली आहेत. त्या बिलावर ऑन लाईन बिल भरू शकता अशी टीप दिलेली आहे. परंतु त्या टिपनुसार नागरिक बिल भरायला गेले तर सातारा पालिकेची बेवसाईट केवळ कार्यलयीन वेळेत सुरू असते. त्यातही मालमत्ता कर भरण्याचा रकानाच उघडत नसल्याने पालिकेत जाऊन गर्दीत रांगेत उभे राहून बिल भरावे लागत आहे.
सध्या कोरोनामुळे अनेक नागरिक ऑन लाईनच व्यवहार करत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत.ग्रामपंचायतीपासून महावितरण कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था ऑन लाईन बिलाची सेवा देत आहेत.सातारा पालिकेचे उलट चित्र निर्माण झाले आहे. वाटण्यात आलेल्या बिलावर ऑन लाईन बिल भरू शकता असे म्हटले आहे. मात्र, बिल भरण्यासाठी इंटरनेटवर सर्च केले असता कार्यालयीन वेळेव्यक्तिरिक्त वेब साईट सुरू होणार नाही. मालमत्ता कराचा रकाना उघडणार नाही. विशेष म्हणजे पालिकेने राबवलेले उपक्रम ही त्या वेब साईट वर नाहीत. पदाधिकारी यांची माहिती नाही. केवळ ही वेब साईट टेंडर प्रक्रिया करण्यासाठी वापरात असल्याचे दिसते.कोरोना काळात तरी गर्दी टाळण्यासाठी या वेब साईटवर मालमत्ता कराचा रकाना सुरू ठेवावा अशी मागणी होत आहे.