तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात मंगळवारी नव्याने 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने 88 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिली.
सोलापूर शहरात मंगळवारी 1458 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1419 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 39 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 23 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6382 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 58210
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6382
प्राप्त तपासणी अहवाल : 58210
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 51828
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 403
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1035
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 4944









