नवी दिल्ली
कोरोनाच्या महामारीमुळे हवाई प्रवासावर निर्बंध आले असून भारतासह संपूर्ण जगातील विमान कंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. इंडिगोला 2 हजार 844 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्पाइसजेटचाही जून तिमाहीचा अहवाल प्रसिद्ध व्हायचा आहे. विमान उद्योगाला यातून वाचवण्याचे झाल्यास 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान उद्योगाला यावर्षी 6 ते साडेसहा अब्ज डॉलरचा फटका बसू शकतो. काही कंपन्या तर बंद पडण्याची शक्यताही सांगितली जात आहे.









