हरमल / वार्ताहर
येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 27 व्या ’हरमलचा राजा’ ला दीड दिवसांचा निरोप देण्यात आला.
सभागृह ते विसर्जन स्थळापर्यत ’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या’,अश्या घोषणा देत भाविकांनी आनंद साजरा केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने अनंत चतुर्दशीऐवजी दीड दिवस उत्सव करण्याचा निर्णय घेतला होता.
यंदाची श्री गणेशमूर्ती माजी अध्यक्ष भाऊ गडेकर यांनी श्रीचरणी अर्पण केली होती.यावेळी विसर्जन सोहळय़ात सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले.केशव,साईदास नाईक,गंगाराम,प्रदीप,रुपेश,रामकृष्ण माज्जी,हरेश मयेकर,मोहन नाईक रामजी, सुभाष,भरत,प्रदीप,रुपेश वस्त, सिद्धेश, उल्हास केपकर,प्रकाश,अक्षय,राघोबा,महादेव गावडे,विशाल,आपा वायंगणकर, साईश,दिगंबर,सागर,विजय,मनोज,संतोष कोरकणकर,उल्हास पै, आदींनी सहकार्य केले.जेेे÷ सदस्य तथा
प्रथम अध्यक्ष रामचंद्र केेरकर यानी
वर्षपद्धतीप्रमाणे सामूहिक गाऱहाणे घातले व मंडळाचे अध्यक्ष संदीप वायंगणकर यांनी सर्वांचे आभार मानले.किनाऱयावर भाविकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.









