प्रतिनिधी / इस्लामपूर
शहरातील लॉकडाऊन म्हणजे ‘न्हाणीला बोळा आणि दरवाजा उघडा’असाच ठरला. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यानेच प्रशासनाने ऐन गणेशोत्सवात रविवार पासून तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. या उत्सवाशी निगडीत बारा बलुतेदार आणि छोटे व्यावसायिक यांच्यावर नुकसानीची कुऱ्हाड कोसळली. तर दुसऱ्या बाजूला शहरातील काही बेकरी व स्वीट मार्ट यांच्यावर प्रशासन व पोलीस यांची कृपादृष्टी झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना ही जागतिक महामारी आहे. या काळात शासनाचे नियम सर्वांना समान आहेत. पण गेल्या महिनाभरात नियमांचा भंग आणि सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे शहर व वाळवा तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. काही खाजगी डॉक्टर, महसूल, पोलीस, आरोग्य अधिकारी यांना कोरोनाची बाधा झाली.’योध्येच’ कोरोना पॉझिटिव्ह येत गेल्याने चिंता वाढली. अशातच गणेशोत्सव आला.त्यामुळे गर्दी वाढून ही महामारी वाढणार यात शंका नव्हती. प्रशासनाने वेळीच सावध होवून लॉकडावून केला.हा निर्णय योग्य होता,कारण सध्या उत्सवापेक्षा जगणं महत्वाचे आहे.
प्रशासनाच्या हाकेला ‘ओ’ देत शहर व वाळवा तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी थांबण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाला जी अनेक वर्षे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना सत्यात उतरण्यास जमली नाही, ती यावेळी साध्य झाली. प्रत्येक गावांत केवळ घरगुती गणपती आसनस्थ झाले. सार्वजनिक गणेशोत्सवाची अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाल्याची ‘सल’ प्रत्येकाच्या मनात आहे.पण जगण्याशी तडजोड करताना ‘देव’ आणि ‘देऊळ’ बंद करावेच लागणार! त्यानुसार सामान्य माणूस प्रशासनाबरोबर आहे. तो ज्यावेळी प्रशासन काही महत्वाचे निर्णय घेईल, त्यांच्याबरोबर रहात आहे. मूर्तीकार,सजावटकार,धूप-अगरबत्ती,फळ विक्रेते इतकंच नाही,तर फ़ुलं आणि दुर्वा विक्रेतेही बाहेर पडले नाहीत. त्यांनी नुकसान आणि पोटाला चिमटा देवून प्रशासना बरोबर रहाण्याचा निर्णय घेतला. पण शहरातील काही बेकरी व स्वीट मार्ट चालकांनी मात्र राजरोसपणे आपला उद्योग सुरु ठेवून नियम भंग केला. प्रशासनाच्या ‘स्वीट’ कृपादृष्टीची शहरात चर्चा होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








