कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर येथील राज्य कामगार विमा मंडळाच्या हॅास्पिटलकरीता मेडीकल व पॅरामेडीकल कर्मचारी वर्ग कमी असलेकारणाने या ठिकाणी आवश्यक असणारा स्टाफ तातडीने भरावा म्हणून खासदार मंडलिक यांनी इएसआयसीच्या महासंचालीका श्रीमती अनुराधा प्रसाद यांची भेट घेवून मागणी केली असता मेडीकल व पॅरामेडीकल स्टाफ भरती प्रक्रियेस विलंब होणार असलेकारणाने श्रीमती अनुराधा प्रसाद यांनी खासदार मंडलिक यांचे सुचनेनुसार या हॅास्पीटलकरीता मुंबई येथील दहा डॅाक्टरांची तातडीने बदली केल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
या पार्श्वभुमीवर अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर येथीर राज्य कामगार विमा योजनेच्या कर्मचाऱ्यांकरीता सन 1996 – 97 साली कोल्हापूर येथे हॅास्पीटल सुरु झाले असून या हॅास्पीटलवर अवलंबून असणाऱ्या सुमारे एक लाख वीस हजार लाभार्थी व त्यांचेवर अवलंबून असलेले कुटूंबीय मिळून सुमारे चार लाख इतकी संख्या होत आहे. खासदार म्हणून निवडून आलेनंतर खासदार मंडलिक यांनी संसदेमध्ये व संसदेच्याबाहेर सातत्याने या हॅास्पीटलसंदर्भात पाठपुरावा केल्याने केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्रीय अभ्यास समितीची नेमणूक करुन All India Medical Science च्या सुचनेनुसार आवश्यक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयीसुविधा बसविणे, ऑपरेशन थिएटर, ट्रामा सेंटर, आयसीयू, पर्यावरणपुरक सर्व उपकरणे बसवणे, 6 अद्यावत ऑपरेशन थिएटर, कर्मचाऱ्यांकरीता निवासी गृह – ५६ सदनिका, वॅाटर ट्रिटमेंट प्लांट / सोलर पॅनल कामांचा समावेश आदीकरीता चाळीस कोटींचा निधी मंजूर केला आहे.
सध्या हॅास्पीटलच्या डागडुजीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. परंतू याठिकाणी मेडीकल व पॅरामेडीकल स्टाफ नसलेकारणाने दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचारामध्ये दिरंगाई होत होती. यासंदर्भात खासदार मंडलिक यांनी इएसआयसीच्या महासंचालक श्रीमती अनुराधा प्रसाद यांची दिल्ली येथे त्यांचे कार्यालयात भेट घेवून यासंदर्भात माहिती देवून मेडीकल व पॅरामेडीकल स्टाफ मंजूर व्हावा याकरीता मागणी केली होती. परंतू, भरती प्रक्रीयेस विलंब लागणार असलेकारणाने श्रीमती अनुराधा प्रसाद यांनी खासदार मंडलिक यांनी केलेल्या मागणीस अनुसरुन आज रोजी मुंबई येथील दहा एम.बी.बी.एस. डॅाक्टरांची कोल्हापूर येथील ESIC हॅास्पीटलमध्ये तातडीने बदली केली असून यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार होणार असल्याचेही खासदार मंडलिक म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









