प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील तीन नगरपालिका व बावन्न गावातील फळ विक्रते, भाजीपाला विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांची आरोग्य तपासणी ज्या त्या गावात करण्यात येणार असून स्वयंसेवी, संस्थांनी, तरुण मंडळांनी यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.
शिरोळ तालुक्यात सध्या कोरोनाचा फैलावा मोठ्या प्रमाणात होत आहे यावर मात करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच तालुक्यातील सर्वच गावातील फळविक्रेते भाजीविक्रेते यांची त्या त्या गावात जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे तसेच त्यांचा स्वॅब घेऊन अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात त्याचा रिपोर्ट ही दिला जाणार आहे येत्या सोमवार पासून ही तपासणी मोहीम सुरु करण्यात येणार आहे. त्यांदृष्टीने प्रयत्न सुरू आहे .
शिरोळ तालुक्यात एक जून ते 15 ऑगस्ट या दीड महिन्याच्या कालावधीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांनी चांगली खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य केले आहे त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नगण्य होती फळ विक्रते भाजीपाला विक्रेते यांच्याशी जनतेशी थेट संपर्क येत असल्याने संसर्ग रोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ म्हणाले की आजअखेर 70 जणांचा मृत्यू झाला आहे बाराशे 74 रुग्ण असून सध्या 728 उपचार घेत आहेत तर 475 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तालुका प्रशासन च्या वतीने खबरदारी घेण्यात आलेली आहे तालुक्यातील वयस्कर लोकांची माहिती गोळ्या करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









