ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 13 हजार 165 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 28 हजार 642 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात तब्बल 346 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी एका दिवसात 9011 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 4 लाख 46 हजार 881 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.9 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 1 लाख 60 हजार 413 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 21 हजार 033 वर पोहोचला आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.35 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 11 लाख 62 हजार 450 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 094 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- प्रमुख शहरे आणि रुग्ण संख्या :
- मुंबई : 17, 914
- ठाणे : 20,104
- पालघर : 6,399
- पुणे : 40,665
- नाशिक : 10,168