ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासात 434 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 29 हजार 326 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 88 आणि काश्मीर मधील 346 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 6 हजार 869 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1564 आणि काश्मीरमधील 5315 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 21 हजार 886 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 4941 रुग्ण जम्मूतील तर 16945 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 561 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 41 जण तर काश्मीरमधील 520 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 4 लाख 18 हजार 363 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 42 हजार 307 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 6 हजार 879 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.