बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने ओणम सणानिमित्त केरळ राज्यासाठी २४ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान विशेष बस सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार बेंगळूरहून कन्नूर, एर्नाकुलम, कन्हानगड, कासारगौड, कोट्टायम, कोझिकोड, पालघाट, थ्रीसुर, तिरुवनंतपुरम आणि वडकारा आणि या ठिकाणांहून बेंगळूरला जाण्यासाठी बसेस सुटतील. म्हैसूरपासून तिरुअनंतपुरम, एर्नाकुलम आणि कोट्टायम आणि या ठिकाणांहून म्हैसूरला जाण्यासाठी बसेस चालतील.
बसमध्ये चढण्यापूर्वी प्रवाशाला केएसआरटीसी अधिकाऱ्यांना नोंदणीचा पुरावा दाखवावा लागणार आहे. सर्व प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.
केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही कर्नाटकसाठी बस चालविण्याची घोषणा केली आहे. केरळहून बससेवा २५ऑगस्टपासून सुरू होणार असून ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यातील बर्याच बसेस तामिळनाडूमधून जातील. केरळ रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन सुलिया, म्हैसूर आणि मडिकेरीलाही बसेस सोडणार आहे.