प्रतिनिधी / फोंडा
वारखंडे-फोंडा येथील हनुमान देवस्थानात श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी 24 तासांचा भजनी सप्ताह साजरा करण्यात आला. शनिवारी समई प्रज्ज्वलीत करून सप्ताहाची सुरूवात झाली. रविवारी दुपारी 12 वा. सप्ताहाची सांगता झाली. कोरोना महामारीसंबंधी सर्व मार्गदर्शक तत्वे पाळून सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी पुरोहित व देवस्थान समितीचे मोजकेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.









