प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हयातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून गेली अनेक दिवस माजी खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना जिवाची बाजी लाऊन भांडत आहे. परंतु शासन लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे दि.24 रोजी जिल्हाधिकारी कार्यलयावर जनावर घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्हयातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून गेली अनेक दिवस माजी खा.राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना जिवाची बाजी लाऊन भांडत आहे.
परंतु शासन लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी याचे नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपारची लढाई करत आहे. शासनास वारंवार विनंती, निवेदने, एकदिवसीय संप संगळे करून सरकार लक्ष देत नाही. आणि शेतकरी करोना महामारी संकटाने पुर्ण उध्वस्त झाला आहे. दुध व्यवसायातील अडी अडचणी जनावरांच्या किमती, चारा, खुराक, औषध उपचार व संगोपन यांचा खर्च परवडत नाही व दुधाला उत्पादनावर आधारित भाव मिळेना व सरकार लक्ष देईना. त्यामुळे आता आरपार लढाई करून बळीराजास वाचविण्यासाठी सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, अमरावती अशी टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरू करत आहोत.
यांची सुरुवात दि. 17 सोलापूर येथुन मा. खा. राजू शेट्टी साहेब याचे नेतृत्वाखाली होत आहे. व सातारा येथे दि. 24 ला भव्य जनावरांसह विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. रोजरोजचा तोटा सहन करुन रोज करोडो रुपयांचा तोटा सहन करण्यापेक्षा लढाईसाठी सज्ज व्हा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरासह धडक मोर्चा बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी ठिक. १२.वा. काढणार आहे.
तरी सातारा जिल्ह्यातील सर्व दुध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक, संकलन केंद्र यांनी जनावरा सह सहभागी व्हावे. व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते याचेशी संपर्क साधावा. मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









