प्रतिनिधी/ सातारा
भारतीय जनता पार्टी च्या सातारा जिह्यातील कार्यकरिणी पदाधिकारी , कार्यकरिणी सदस्य , मोर्च्यांचे अध्यक्ष आणि आघाडय़ांचे संयोजक यांच्या निवडी , सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जाहीर केल्या आहेत. कार्यकरिणीमध्ये तरुण तसेच अनुभवी चेहेयाना संधी देण्यात आली असून जिह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि समाजातील विविध घटक लक्षात घेऊन सर्व घटकांना कार्यकरिणीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जिल्हा सरचिटणीस पदी चंद्रशेखर वडणे, भरत मुळे, महेंद्रकुमार डुबल, सचिन घाडगे, विठ्ठल बलशेटवार यांची, जिल्हा उपाध्यक्ष पदी तानाजी भिलारे, ऍड प्रशांत खामकर, जयकुमार शिंदे, मनोज कलापट, दीपक महाडिक, राहुल शिवनामे, प्रमोद गायकवाड, सुरेश पाटील, सतीश भोसले, सौ. कविता कचरे यांची, जिल्हा चिटणीस पदी यशवंत लेले, देविदास चव्हाण, सुनील जाधव, अनिल माळी, सुहास पोरे, सौ.शालिनी गुणवंत, सौ. सरिता पाटील, सौ.मुक्ती शहा, दीपाली खोत, सौ. सुवर्णा साखरे, सौ. जयश्री कारंडे, महिला मोर्च्या अध्यक्षपदी सौ. सुरभी चव्हाण, अल्पसंख्यांक मोर्च्या अध्यक्ष पदी राजू मुल्ला, अनुसूचित जाती मोर्च्या अध्यक्ष पदी शैलेंद्र कांबळे यांची तसेच आघाडय़ांच्या संयोजक पदी
व्यापारी आघाडी सचिन साळुंखे, भटके विमुक्त आघाडी रुपेश मुळे, सहकार आघाडी प्रभाकर साबळे, वैद्यकीय आघाडी डॉ. उत्कर्ष रेपाळ, जेष्ठ नागरिक आघाडी बबन कांबळे, कामगार आघाडी अलीमहंमद आगा, आरोग्यसेवा आघाडी विवेक कदम, कायदा आघाडी ऍड दत्तात्रय हांगे, सोशल मीडिया आघाडी दिगंबर सूर्यवंशी, उद्योग आघाडी निलेश शहा, आध्यत्मिक आघाडी नितिन भुणगे, प्रज्ञा आघाडी फत्तेसिह पाटणकर , क्रिडा आघाडी महेश कोकरे, शिक्षक आघाडी सदाशिव खाडे, माजी सैनिक आघाडी संदीप पवार यांच्या नियुक्या घोषित केल्या आहे अशी माहिती भाजपच्यावतीने देण्यात आली.








