प्रतिनिधी/ बेळगाव
लक्ष्मीटेक येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या हेडक्वॉर्टर्समध्ये आदित्य मिल्क पार्लरचा शुभारंभ करण्यात आला. सुभेदार मेजर सलिम एस यांच्या हस्ते या मिल्क पार्लरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ऍडम कमांडंट बी. एन. चेतन व सुभेदार मेजर वरुणकुमार यांचे स्वागत आदित्य मिल्कचे बेळगाव शाखा प्रमुख यल्लाप्पा गुरव व मार्केटींग मॅनेजर चंद्रकांत पी. एस. यांनी केले. या मिल्क पार्लरमुळे परिसरातील रहिवाशांना दूध व दूग्धजन्य पदार्थ उपलब्ध होणार आहेत. सध्या कोरोनामुळे सुरक्षिततेवर भर दिला जात असून आदित्य मिल्क ग्राहकांना अधिकाधिक चांगले दूध पुरवत आहे. सुभेदार मेजर सलिम एस. यांनी आदित्य मिल्कच्या या उपक्रमाचे कौतुक केले.









