प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघड झाल्यानंतर पोलिसांनी बार्शी बाजार समिती येथील अनेक व्यापारी यांच्या दुकानावरती धाडी टाकण्याचे काम चालू केले होते. अनेक व्यापाऱ्यांचे गाळे, दुकाने आणि गोडावून तपासणी करून हजारो रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी साठा केलेला पोलिसांना आढळला होता. संबंधित व्यापार्यावर गुन्हे दाखल असून त्यांचे तपास चालू आहेत. बार्शी बाजार समिती मधील सर्व व्यापारी यांनी पोलीस नाहक त्रास देत आहेत. अशी भूमिका घेऊन दिनांक 12 ऑगस्ट पासून बार्शी बाजार समिती बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आज सर्व प्रशासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व बार्शी बाजार समितीमधील व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत बार्शी बाजार समितीने पुकारलेल्या बंद आज पासुनच मागे घेतला जात असून पोलिसांना त्यांच्या तपासात सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
यावेळी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी हेमंत निकम, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, तहसीलदार कुंभार, जिल्हा उपनिबंधक भोळे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी, सहाय्यक निबंधक अभयकुमार कटके, तालुका पोलीस ठाण्याचे शिवाजी जायपत्रे, किराणा भुसार व्यापारी संघाचे अध्यक्ष अविनाश तोष्णीवाल, बाजार समिती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष काळदाते , सचिव भरतेश गांधी आणि सर्व व्यापारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत बोलताना राजेंद्र राऊत यांनी सांगितले की, बार्शी बाजार समितीमध्ये रेशनचा पकडलेला मालाचा काळाबाजार काही मोजकेच व्यापारी करत आहेत. बाकी सर्व व्यापारी निर्दोष आहेत. मात्र या व्यापाऱ्यांना त्रास होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. यावरती प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले की, बार्शी बाजार समितीमध्ये आलेला रेशन धान्य काळ्या बाजारात नेण्यासाठी जात असताना पकडला जात आहे. अनेक साठे जप्त केले आहेत. या सर्व प्रकरणाची मुळापासून चौकशी चालू आहे. रेशन दुकानदारांपासून ते उच्च पदस्थ अधिकारी आणि व्यापारी यांच्या चौकशी चालू आहेत. त्यामुळे आत्ताच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीच भूमिका घेता येणार नाही.
या सर्व काळ्या बाजारात सहभागी असणाऱ्यांना नक्की शासन होणार आहे. त्याचबरोबर आता सध्या शेतकरी आणि व्यापारी ही सर्व जण लॉकडाउनच्या काळानंतर सावरत असताना अशा प्रकारे बाजार समिती बंद करणे योग्य नाही. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने निकम यांनी आवाहन केले की समिती चालू करावी, व्यापार चालू करावे जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळेल या बैठकीत जिल्हा उपनिबंधक पोलीस उपअधीक्षक मोरे , पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी सुद्धा आपल्या भूमिका मांडल्या आणि बैठकी अंती सर्वानुमते आज पासुनच बार्शी बाजार समिती संप मागे घेत असून आज पासुनच पोलिसांना तपासात सहकार्य करणार अशी भूमिका सर्वांनी सर्व व्यापारी यांनी घेतली. त्यामुळे बार्शी बाजारपेठेच्या बंदचा निर्णय आता झालेला असून याबाबत प्रशासनाने ही सर्व व्यापार यांचे आभार मानले या बैठकीचा समारोप सचिव सचिव भरतेश गांधी यांनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









