बेंगळूर / प्रतिनिधी
मंगळवारी रात्री झालेल्या देवराजीवनहळ्ळी (डीजे हळ्ळी) आणि कडुगोंडनहळ्ळी (केजी हळ्ळी) हिंसाचारानंतर रॅपिड फोर्स, केएसआरपी आणि बेंगळूर पोलिसांनी केआर मार्केट, चामराजेपेट आणि कलासीपाल्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढला.
मंगळवारी रात्री एका सोशल मीडिया वरील पोस्ट मुळे हिंसाचार झाला. यावेळी जमावाने काँग्रेस आमदारांच्या घरावर हल्ला केला होता. यांनतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात करण्यास सुरुवात केली आहे. आता पर्यंत २०० हुन अधिक जणांवर कारवाई करण्यात अली आहे.