प्रतिनिधी / नागठाणे
सातारा तालुक्यांमधील ग्रामीण भागातून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढू लागला आहे. बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार नागठाणे परिसरातील गावांना कोरोनाने चांगलेच हादरे दिले असल्याचे निदर्शनास येत आहे. अतीत येथे एकाचवेळी दहा जणांना कोरोनाची लागण झाली असून नागठाणेतही पाच जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर भरतगाववाडीमध्ये गर्भवती महिलेस कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनापूर नंतर अतीत, नागठाणे गावात मोठ्या प्रमाणात बाधित सापडल्याने या दोन्ही गावात खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात अतीत येथे २०,३३,६० व ८४ वर्षीय महिला व १६,३६,४७,५१,५५ व ६६ वर्षीय पुरुष अश्या दहा जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर नागठाणे येथे १४ व १५ वर्षांच्या युवती,६५ वर्षीय महिला,११ वर्षांचा मुलगा व २० वर्षाच्या युवकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी सकाळी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राने दोन्ही ठिकाणी धाव घेत बाधितांचा हाय रिस्क कॉन्टेक्ट शोधण्यास सुरवात केली तर महसूल विभागाने दोन्ही गावातील बाधितांचा घरापासूनचा आजूबाजूचा परिसर कंटेन्मेंट झोन केला आहे. भरतगाववाडी येथेही ३७ वर्षीय गरोदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने बाधिताच्या घराजवळील परिसर कंटेन्मेंट झोन केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









