या आसनामुळे शरीर हनुमानासारखे बळकट आणि लवचिक होते. हे आसन येण्यासाठी आधी व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच शक्यतो हे आसन तज्ञांच्या सल्ल्यानं आणि सहकार्यानंच करावं अन्यथा कायमची दुखापत होऊ शकते.
- हनुमानासन करण्यासाठी
- जमिनीवर ताठ उभं राहावं.
- गुडघ्यांमध्ये अंतर घ्यावं. उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पुढे घ्यावा आणि उजव्या पायाची मांडी बाहेरच्या बाजूला वळवावी. हे करण्यासाठी पाऊल थोडं उचलावं लागेल. त्यामुळे टाचेच्या बाहेरील बाजूस पायाचे वजन तोलले जाईल.
- श्वास सोडत शरीराचा कंबरेच्या वरील भाग पुढील बाजूस झुकवावा. हाताच्या बोटांनी जमिनीवर दाब द्या. हळूहळू डावा पाय गुडघ्यामधून पाठी मागे न्या. गुडघे ताठ असावेत. हळूहळू उजवी मांडी
- जमिनीकडे न्यायला सुरूवात करा. पाय जास्त ताणले गेल्यानंतर गुडघे ताठ करायचे थांबवा.
- यानंतर उजवी टाच शरीरापासून दूर न्यायचा प्रयत्न करा. पाय हळूहळू आतल्या दिशेला वळवायला सुरूवात करा. गुडघ्याच्या वाटय़ा छताच्या दिशेनं येतील. जेव्हा पुढे केलेला पाय पूर्णपणे जमिनीवर सरळ समांतर टेकलेला असेल, तेव्हाच डावा पाय आणि गुडघा पाठीमागे ताणून जमिनीच्या दिशेनं दाबा.
- हळूहळू काळजीपूर्वक डाव्या पायाची मांडी पाठीमागे उजव्या पायाच्या मांडीच्या विरूद्ध दिशेनं टेकवा. उजवा पाय सरळ पुढे आणि डावा पाय सरळ पाठीमागे जमिनीला समांतर टेकलेला असावा. आता हात वर डोक्याकडे खेचा आणि नमस्कार स्थितीप्रमाणे जोडा.
- सुरूवातीला काही सेकंदांसाठी आणि हळूहळू 1 मिनिटापर्यंत आसनस्थिती स्थिर करा. आसन सोडताना हात खाली आणून जमिनीवर दाबा. पुढे असलेला उजवा पाय बाहेरील बाजूस वळवा आणि हळूहळू पूर्व स्थितीत या. हेच आसन डावा पाय पुढे घेऊन परत करा.
- हनुमानासनामुळे पायांना आणि मांडीच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो आणि लवचिकताही येते. पोटोचे स्नायू आणि आतील अवयवांनाही व्यायाम होऊन बळकटी येते. कंबर आणि हिप्सचे स्नायू मोकळे व्हायला मदत होते. पचनसंस्थेचं काम सुधारतं. सायटिका होत नाही. झोपेच्या तक्रारी दूर होतात.