बेळगाव
सोनार गल्ली, वडगाव येथील एक महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाली आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असून शहापूर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पूजा श्रीधर सुणगार (वय 32), मुली प्रणाली (वय 9 वर्षे) आणि स्वराली (वय 9 वर्षे) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. पूजा या ब्युटीपार्लरमध्ये काम करतात. 9 ऑगस्ट रोजी दुपारी मैत्रिणीच्या घरी जाऊन येण्याचे सांगून पूजा ही आपल्या दोन मुलींसह घराबाहेर पडली होती.
पती श्रीधर सुणगार यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस या तिघा जणांचा शोध घेत आहेत. या मायलेकींविषयी कोणाला माहिती मिळाल्यास शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








