- पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
ऑनलाईन टीम / पुणे :
विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ यांच्यावतीने गुरूवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी, दुपारी 4.00 वाजता ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ याविषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ‘एनवायसीएस इंडिया’ या फेसबुक पेजवर हा लाईव्ह वेबिनार होणार आहे.
या वेबिनारचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेबिनारचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर भूषविणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यावेळी विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन राजेश पांडे, डॉ. प्रशांत साठे, डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंथलकर, डॉ. महेश आबळे, प्रसनजीत फडणीस आणि विजय सोनवणे यांनी केले आहे.









