बेंगळूर /प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मंगळवारी रात्री कॉंग्रेसचे आमदार श्रीनिवासमूर्ती यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.
कावळ बायरासंद्रमध्ये हिंसक घटनेचा आणि जमावाला भडकावणार्या सोशल मीडिया पोस्टचा मी निषेध करतो. असे सिद्धरामय्या यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. तसेच मी परिसरातील हिंदू व मुस्लिम दोघांनाही शांत राहण्याची, शांतता प्रस्थापित करण्याची व सुसंवाद साधण्याची विनंती करतो. असेही ते म्हणाले आहेत.
सिद्धरामय्या यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी कर्नाटक सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हंटले आहे. तसेच बेंगळूरच्या पोलिस आयुक्तांशी घटनेत सामील झालेल्या आणि तसेच दोषींना त्वरित अटक करण्याचीही मागणी केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
आमचा अनुभव सांगतो की जातीय दंगलींमध्ये केवळ निष्पापांना त्रास होतो. दोन्ही धर्मातील नेत्यांना या विषयावर शांततेने चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी आणि त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आवाहन करतो, ”असे सिद्धरामय्या म्हणाले.