ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये देखील कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता पंजाबमधील जेल मध्ये कैद्यांची अधिकृत क्षमता 50% पर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे. कारण यामुळे जेलमध्ये सोशल डिस्टंसिंगसह त्यांचे विलागिकारण करण्यासाठी वेगळी जागा तयार केले जाऊ शकते. या निर्णयानुसार आता अजून 3500 ते 4000 कैद्यांना मुक्त केले जाणार आहे. याआधी 9500 कैद्यांना मुक्त करण्यात आले आहे.
जेल मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितले की, ही कारवाई लॉक डाऊनचे निर्बंध शिथिल केल्याने, गुन्ह्यांचे प्रमाण आणि कैद्यांची संख्या वाढल्याने केली जात आहे. पुढे ते म्हणाले, विशेष जेलमध्ये कैद्यांचे प्रमाण महिन्याला 3000 इतके आहे. सद्य स्थितीत राज्यातील जेलमध्ये 17 हजार 500 कैदी आहेत. तर एकूण क्षमता 73 टक्के आहे.
पुढे ते म्हणाले, तुरुंग प्रशासनाला कोरोना रोखण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उच्च स्तरीय कमिटीची तिसऱ्या मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला की, तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकृत क्षमता 50 टक्के पर्यंत आणण्यात आली आहे.