आयात पोहचली 1.11 कोटी टनावर : अतिरिक्त साठय़ाचा बंदरांमध्ये पडून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कोळसा आयात जुलैमध्ये 43.2 टक्क्मयांनी घटून 1.11 कोटी टनावर आली आहे. खाणींची कोठारे, प्रकल्प आणि बंदरांमध्ये कोळशाचा साठा मोठय़ा प्रमाणात पडून राहिला आहे. ही स्थिती आयातीत घसरण झाल्यानेच निर्माण झाल्याची माहिती एमजक्शन सर्व्हिसेस यांच्याकडून देण्यात आली आहे.
सदरची आयातीची आकडेवारी ही जहाजामधील स्थिती व परिवहन कंपन्या यांच्याकडून मिळणाऱया आकडेवारीमधून निश्चित केली जाते. जुलै 2019 मध्ये कोळसा आयात 1.96 कोटी टन झाली होती. तर एमजक्शन हा टाटा स्टील आणि सेलचा संयुक्त उद्योग आहे. ही एक बिझनेस टू बिझनेस ई कॉमर्स कंपनी आहे. जी कोळसा आणि पोलाद यांच्यावर शोध अहवाल प्रकाशीत करीत असते.
एमजक्शनच्या माहितीनुसार जुलै 2020 मध्ये कोळसा आयात 1.11 कोटी टन राहिली आहे. तर जुलै 2019 मध्ये कोळसा आणि कोक यांची आयात 1.96 कोटी टन इतकी होती. चालू वित्त वर्षातील पहिल्या चार महिन्यात म्हणजेच एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत एकूण कोळसा आयात 5.72 कोटी टन राहिली आहे. या अगोदरच्या वर्षात याच कालावधीत हा आकडा 8.91 कोटी टनापेक्षा 35.76 टक्क्मयांनी कमी राहिल्याची माहिती आहे.
कोळसा खाण, प्रकल्प व बंदरामध्ये कोळशाचा साठा मोठय़ा प्रमाणात उलपब्ध असल्याच्या कारणामुळे आयात घसरत गेली असल्याचे एमजक्शनचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय वर्मा यांनी म्हटले आहे.









