प्रतिनिधी / हुपरी
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास आदेश देऊन हुपरी व पट्टणकोडोली मंडल कार्यालयाच्या क्षेत्रातील पूरग्रस्त गावासाठी एक यांत्रिकी रबरी बोट, दहा लाईफ जॅकेट,२ लाइफ रिंग आदि साहित्य उपलब्ध करुन दिले यासाठी या भागाचे आमदार राजूबाबा आवळे यांनी पाठपुरावा केला.
त्यामध्ये हुपरी व पट्टणकोडोली मंडलातील इंगळी,अल्लाटवाडी ,रांगोळी, रेंदाळ तांबे मळा, माळी मळा ,गंगानगर, आंबिकानगर,रुई या ठिकाणी मोठया प्रमाणात पुराचे पाणी येत असते प्रामुख्याने पूरबाधित होणाऱ्या गावांमध्ये या यांत्रिक बोटीचा वापर करण्यात येणार आहे. सदर बोटीचा प्रात्यक्षिक कार्यक्रम आज सोमवार दुपारी रुई बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये आधार रेस्क्यू फोर्स, टाकवडे कोल्हापूर येथील 15 जणांच्या टीमच्या सहकार्याने मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले की चालू आठवड्यात हवामान खात्याने मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पूर परिस्थिती वाढली तर सदर बोटीचा वापर करण्यात येणार आहे. पुरबाधित नागरिकांनी कोणताच विचार न करता आतापासूनच सुरक्षितस्थळी स्थलांतर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी मंडळ अधिकारी ए.डी. पुजारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Previous Articleकर्नाटक राज्याचा एसएसएलसीचा निकाल जाहीर, बेळगाव जिल्हा क श्रेणीत
Next Article कोल्हापूर : लग्न समारंभात चोऱ्या करणाऱ्या एकास अटक








