ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती स्वतः विश्वास सारंग यांनी ट्विट करत दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आले आहेत. पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आल्यापासूनच मी होम क्वारंटाइनमध्ये आहे. माझे सर्वांना आवाहन आहे की, जी लोकं माझ्या संपर्कात आली आहेत त्यांनी स्वतः ची कोरोना चाचणी करून घ्यावी.
विश्वास सारंग हे मध्य प्रदेशातील चिकित्सा शिक्षण मंत्री आहेत. दरम्यान, यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ते सात दिवस होम आयसोलेशनमध्ये आहेत.