वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत सहभागी होत असलेल्या जमशेदपूर एफसी फुटबॉल क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदी आयर्लंडचे 54 वर्षीय ओवेन कॉयली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातव्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात जमशेदपूर एफसी फुटबॉल संघाला कॉयली यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. कॉयली याचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला असला तरी ते आयर्लंडमध्ये स्थायिक झाले. कॉयली हे बोल्टन वाँडरर्स क्लबचे माजी व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. भारतीय फुटबॉलपटूंना मार्गदर्शन करताना त्यांच्याबरोबर सहवासाची संधी आपल्याला मिळत असल्याबद्दल कॉयली यांनी समाधान व्यक्त केले आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाल्यानंतर जमशेदपूर एफसी संघाने तीन वर्षांच्या कालावधीत चार व्यवस्थापक बदलले आहेत. स्टीव्ह कोपेल आणि सिझर फर्नांडो यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या पहिल्या दोन हंगामात जमशेदपूर एफसी संघाने पाचवे स्थान मिळविले होते.









